पुणे : लाकडी दांडके तसेच शस्त्राच्या आधारे ऑटोमोबाईल आणि वाशिंग सेंटर लुटणार्या टोळक्याला चतु:श्रृगी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. धक्कादायक म्हणजे, त्यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बालेवाडी परिसरात केली आहे. अलीम सय्यद (वय १९), देवा शिरोळे (वय २०), मोहन अडागळे (वय १९) यांच्यासह अन्य ५ अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंद्धेश्वर दिगंबर ढेरे (वय ३४, रा. पाटील वस्ती, बालेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, उपनिरीक्षक प्रविल चौगुले, पोलीस अंमलदार श्रीकांत वाघेले, दांगडे आदीच्या पथकाने केली.
तक्रादार ढेरे यांचे प्रथमेश पार्क सोसायटी बालेवाडीसमोर रविराज ऍटोमोबाईल ऍन्ड वाशिंग सेंटर आहे. अली सय्यद आणि त्याच्या साथिदारांनी लाकडी दांडके आणि धारधार हत्याराचा धाक दाखवून तक्रारदार आणि त्यांच्या ४ मित्राकडून ४९ हजार रोख रक्कम आणि २० हजार किंमतीचा एक मोबाईला घेउन गेले होते. याबाबत तक्रारदार यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली होती. चतुश्रृगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बाळकोटगी यांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध घेण्याबाबत तपास पथकांना सूचना केल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळे गुरव येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.