मुंबई : गणपती बाप्पाला मंगळवारी म्हणजे अनंत चतुर्दशीला निरोप दिला जाणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगर पालिका, पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. या विसर्जन सोहळ्यादरम्यान मुंबईमध्ये वाहतूक व्यवस्थेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अनेक मार्गावर नो पार्किंग करण्यात आले आहेत. तर मुंबईतील काही पुलांवरून विसर्जन मिरवणूक घेऊन जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. धोकादायक पुलावरून मिरवणूक जाताना पुलावरून १०० पेक्षा अधिक व्यक्ती विसर्जन मिरवणूकी वेळी जाणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. विसर्जन मिरवणुका जुन्या तसेच धोकादायक पुलावर थांबणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच, विसर्जन मार्गावर अवजड वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे. नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगांवकर मार्ग, जे. एस. एस. रोड, विठठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबा साहेब जयकर मार्ग, राजा राम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टैंक रोड, पंडिता रमाबाई मार्ग, दादासाहेब भडकमकर मार्ग असे मार्ग वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (आवश्यकतेनुसार), महापिलाक मार्ग (आश्यकते नुसार), एस व्ही पी रोड, संत सेना मार्ग, नानुभाई देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, जिनाभाई मुलजी राठोड मार्ग, पी डिमेलो रोड अनंत चतुर्दशीला बंद ठेवण्यात येणार आहेत.
महत्वाचे म्हणजे विसर्जन मार्गावर वाहने उभी करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. २१ मार्गावर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दादरमधील ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, संपुर्ण केसकर रोड, एम. बी. राउत रोड, टिळक ब्रिज, एस. के. बोले रोड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. जुहू येथीलही देवळे रोड, जूहुतारा रोड हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील १३ पुलांवरून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक घेऊन जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोर ओव्हर ब्रिज, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिजवरून विसर्जन मिरवणूक घेऊन जाताना खबरदारी घ्यावी. तसंच, मरीन लाईन्स, सँडहस्ट, ग्रँड रोड आणि चर्नी रोड दरम्यान असणाऱ्या फ्रेंच ब्रिज, कनेडी ब्रिज, बेलासीस ब्रिज, महालक्ष्मी स्टील रेल्वे ब्रिज, प्रभादेवी पॅरल ओव्हर ब्रिज, दादर टिळक ब्रिजवर देखील विसर्जन मिरवणूक थांबवता येणार नाही. या ब्रिजवर एकाच वेळी १०० पेक्षा जास्त जणांना जाता येणार नाही.