मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यांना ११ लाखांचे बक्षीस देऊ असं वादग्रस्त विधान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी केलंय. आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींवर आक्षेपार्ह भाषेत संजय गायकवाडांनी टीका केलीय.आरक्षणाची भाषा संपवणाऱ्यांचं मनातील ओढावर आल्याचंही गायकवाड म्हणालेत. राहुल गांधी यांना मागासवर्गीय , आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे, काँग्रेसचा खरा चेहरा आणि पोटातील मळमळ बाहेर आली, असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसात उमटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणा-या संजय गायकवाडांविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत. सत्तेमुळे हिंसेची व्यवस्था निर्माण झालीय. भाजपनं संजय गायकवाडांवर सुमोटो कारवाई अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. तर मोदींबद्दल असं विधान केलं असतं तर जी कारवाई केली असती, तीच करावाई संजय गायकवाड करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केलीय. दरम्यान संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर भाजपने हात झटकले आहेत. संजाय गायकवाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसंच आरक्षण रद्द करू असं राहुल गांधी म्हणाले. नेहरू, राजीव गांधी आता राहुल गांधी, काँग्रेसच्या तीन पिढीच्या जे पोटात होतो त्याच आज ओठात आलं. NDA सरकार संविधान बदलनार असं वक्तव्य करत होते. खरंतर काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला. खऱ्या आरक्षणाचे मारेकरी हे काँग्रेस आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.