रायगड : खालापूर तालुक्यातील सावरोली ते इंडियाबुल्स कॉलनी दरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस वे- वरील पुलाखालील रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्यामुळे दररोज अपघात घडत असल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी, महिलावर्ग तसेच कामगारांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.याची दखल घेत ठाकरे शिवसेेनेची युवासेना आक्रमक झालेली आहे. हे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी संघटनेच्या पदाधिकार्यां नी आयआरबीसह पोलीस यंत्रणेकडे केलेली आहे. तालुका शिष्टमंडळाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयआरबी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
मागणीची तत्काळ दखल न घेतल्यास पुढील काळात ठाकरे गट युवासेनेच्या टाईल्सने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तसेच याप्रसंगी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनाही निवेदन देण्यात आले. खालापुर तालुक्यातील काही ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असता काही मुख्य रहदारींच्या रस्त्याची ही खड्डेमय स्थिती बनल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला होत असताना तालुक्यातील मुख्य रहदारीचा रस्ता असणारा खालापूर पेण मार्गावरील मुंबई पुणे एक्सप्रेस वे ब्रिज खालील सावरोली ते इंडियाबुल्स कॉलनी दरम्यानचा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने याचा नाहक त्रास वाहन चालक प्रवासी वर्ग शाळकरी विद्यार्थी चाकरमानी यांना करावा लागत आहे. तर याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवासेना आक्रमक झाली असून ९ सप्टेंबर रोजी आयआरबी प्रशासनाला निवेदन देत हा रस्ता खड्डे मुक्त करावा अशी मागणी केली असून हा रस्ता जर खड्डे मुक्त झाला नाही तर पुढील काळात शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासैनिकांनी आयआरबी कंपनीला दिला.







