मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना डिजिटल माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. प्रत्येक डिजिटल माध्यमांचा उपयोग करताना मराठीचा उपयोग करीत अधिक सक्षमपणे पुढील पिढीपर्यंत समृद्ध मराठीचा वारसा नेण्यात यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. उपमुख्यमंत्री सुनिता पवार म्हणाल्या, लंडनमध्ये मराठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे केंद्र ठरणाऱ्या प्रस्तावित महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागील काळात पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मराठी भाषेच्या प्रचारासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदानही वाढवून देण्यात आले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे समस्त मराठी जन आनंदित झाले आहेत. हा मराठी भाषेचा खूप मोठा गौरव आहे. मराठी भाषा ही अर्थाजनाची भाषा होण्यासाठी हा दर्जा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.






