मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर १७ जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली. या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधत कडक कारवाई करत काही निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानन संतप्त झाला आहे.
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेत लोकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अटारी-वाघा बॉर्डर देखील १ मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना देश सोडण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची व्हिसाची मुदत रविवारी (२७ एप्रिल) संपला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास त्यांच्यावर इमिग्रेशन ॲड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या आदेशानंतर रविवारपर्यंत ५३७ नागरिक पाकिस्तानत परतले आहेत. तसेच या काळात १ हजार ३८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशात परतले आहे. रविवारी 237 नागरिक अटारी-वाघा बॉर्डरवरुन परतले आहेत. तर १६६ भारतीय नागरिक परत आले आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना २९ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.





