मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये एप्रिल महिन्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात ₹१५०० इतकी आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे.
ही रक्कम एप्रिल महिन्याची असून मे महिन्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. लाभार्थीं महिलांनी आपली रक्कम जमा झाली आहे की नाही, हे खात्री करण्यासाठी आपले बँक खाते तपासावे. आवश्यक असल्यास बँक शाखा, स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







