वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघातील गोलंदाजांनी २३० धावांचा बचाव करताना १०० धावांनी विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडचा डाव अवघ्या १२९ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारतीय संघाने पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान होता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानी होता. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करताच भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. हे ६ सामने जिंकून १२ गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर ६ पैकी केवळ १ सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ २ गुणांसह सर्वात शेवटी आहे. या पराभावसह इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पाडला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान होता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानी होता. या सामन्यात इंग्लंडला पराभूत करताच भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. हे ६ सामने जिंकून १२ गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर ६ पैकी केवळ १ सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ २ गुणांसह सर्वात शेवटी आहे. या पराभावसह इंग्लंडचा संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर पाडला आहे.