पुणे : इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर च्या हद्दीत रात्रीच्या वेळी विश्रांतीसाठी थांबलेल्या मालवाहतूक वाहनातील अंधाराचा फायदा घेऊन डिझेल चोरीच्या घटनांसह वाहनचालकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेक वेळा संबंधित वाहन चालक हे परराज्यातील गुन्हा दाखल करण्यासाठी येत नाहीत. यामुळे अशा घटनांमध्ये वाढत होत चालली असून याबाबत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्ग हा सतत वर्दळीचा महामार्ग म्हणून गणला जातो. या मार्गावरील नियमित मालवाहतूक अवजड वाहनांची ये जा होत असते. अशावेळी चालक रात्रीचा प्रवास टाळून विश्रांती घेण्यासाठी एखाद्या हॉटेलच्या कडेला रस्त्याच्या बाजूला, पेट्रोल पंपावर थांबत असताना अशा वेळी गाडीचे ड्रायव्हर हे बऱ्याच वेळा एकटेच असतात याचाच डिझेल चोरनारे भुरटे चोर फायदा घेत असल्याचे दिसत असून गाडीतील डिझेलसह चालकाचे पैसे व मोबाईल इतर साहित्य घेऊन चोरी करून ही टोळी फरार होत आहे.
यामध्ये विशेष म्हणजे अनेक चालक राज्याच्या इतर भागातील किंवा बाहेरच्या राज्यातील असल्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत नाहीत. मात्र सध्या याचच हे चोर फायदा घेत असून महामार्गावर अशा भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला आहे. १ ऑक्टोबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गवर वनगळी गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या सुरक्षारक्षाने चोरांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने चोरांनी डिझेल रस्तावर ओतुन पळ काढल्याची घटना घडली आहे. मात्र या प्रकरणी कोणाचीही तक्रार नसल्याने पोलीस स्टेशन येथे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.





