मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांना यंदाचा उद्योगरत्न पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतल्या कुलाबा इथल्या हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्याना प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेदेखील उपस्थित होते. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केलं. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह, आणि २५ लाख रुपयांचा धनादेश आणि आजच्या या खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्याना सन्मानपूर्वक प्रदान केले. या सन्मानामुळे या सन्मानाचा गौरव वाढला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टाटा ग्रुप हा देशभरात तसंच जगभरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे सर्वसामान्यांना परडवडणाऱ्या कारपासून एअरलाइन्स पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये टाटा हे नाव अभिमानाने घेतले जातं टाटा म्हणजे विश्वास, टाटा म्हणजे ट्रस्ट अशी भावना सर्वांची आहे. त्यामुळे उद्योग रत्न पुरस्कार पहिल्यांदा जाहीर झाला आणि तो रतन टाटा यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
उद्योग विभागासाठी हा सुवर्णक्षण आहे अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या वतीने पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा महाराष्ट्रातील आणि मुंबईतील उद्योग जगतामध्ये तसंच जगाच्या पाठीवर टाटा समूह कीर्तीवंत केला अशा टाटा सन्सचे सर्वेसर्वा रतन टाटांना जाहीर केला. त्यांच्या घरी सन्मानपूर्वक हा पुरस्कार बहाल केला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. पुरस्कार अनेक दिले जातात मात्र या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या उद्योग विभागाची उंची वाढली आहे. या पलीकडे उत्तुंग नेतृत्व असलेला जो टाटा समूह आहे त्याच म्युझियम महाराष्ट्रात उभा करावं अशी विनंती उदय सामंत यांनी यावेळी तिन्ही नेत्यांसमोर केली. रतन टाटा आणि चंद्रशेखर यांनी हे मान्य केलं आहे. येत्या काळात जागतिक स्तरावरचा प्लांट तयार करून टाटा उद्योग समूहाचां एक म्युझियम महाराष्ट्रात तयार केलं जाईल असंही उदय सामंत यांनी सांगितलं. उद्योगपती रतन टाटा यांनी महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये पूर्ण मार्गदर्शन करण्याची ग्वाही यावेळी दिली. महाराष्ट्र कसा पुढे न्यायचा याबाबत ते मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार हा रतन टाटा यांनी स्वतः स्वीकारला आणि महाराष्ट्र राज्याला शुभेच्छा दिल्या. रतन टाटा हे १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते. १०० कंपन्यांसह टाटा समूह जगातील पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे. यामध्ये टाटा टी, लक्झरी हॉटेल्स, स्टील, ऑटोमोबाईल्स आणि विमान कंपनीचा समावेश आहे.