• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 1, 2022
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ उपक्रमाचे उद्घाटन मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते जी-उत्तर कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार सदा सरवणकर, मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते. हा उपक्रम १ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, मुंबई आर्थिक राजधानीचे शहर असल्याने देशभरातून लोक येथे येतात. यामुळे सार्वजनिक व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी महानगरपालिकेवर असून, ते ती पूर्ण करीत आहे. तथापि, हे शहर स्वच्छ राखण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिकेची नसून यासाठी लोकसहभाग देखील महत्त्वाचा आहे. यासाठी शासनाचे सर्व विभाग याकामी सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी देत असलेल्या सुविधांचे तसेच महानगरपालिकेच्या कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.

सर्वसामान्यांसाठी रोजगार निर्मितीवर भर..

मुंबई शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात येणार आहे. याअंतर्गत कोळीवाडे, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या परिसरांचे सौंदर्यीकरण, पायाभूत सुविधांचा विकास यावर भर देण्यात येत आहे. मुंबईकरांना विविध प्रकारचे अन्नपदार्थ चाखायला मिळावेत तसेच सर्वसामान्यांना अधिक रोजगार मिळावा यासाठी दक्षिण मुंबईतील काही भागांत फूड कोर्ट निर्माण करण्यात येणार आहेत. हे करीत असताना स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आजारांचे मूळ अस्वच्छतेत असल्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी, असे आवाहन आमदार सदा सरवणकर यांनी केले. तर उपायुक्त श्री.बिरादार यांनी स्वच्छता अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. श्रीमती जाधव यांनी स्वच्छतेसाठी लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार महानगरपालिकेमार्फत उपाययोजना केल्या जातील, याबाबत आश्वस्त केले. ‘सिटी ऑफ लॉस एंजेलिस’ या महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. एड्स नियंत्रण दिनाचे औचित्य साधून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेमार्फत ‘मितवा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

१ एप्रिलपासून राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION