ठाणे : कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूचे सत्र सुरूच. गुरुवारी रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी अवघ्या दहा तासात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली असताना आता आज सोमवारी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश. रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही मृत्यूचे सत्र काही थांबले नाही. कळवा रुग्णालयावर सध्या प्रचंड ताण आहे. रुग्णालयात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण गेल्या ४ दिवसात २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रविवारी मृत्यू झालेल्या १७ पैकी १३ रुग्ण हे ICUमधील होते तर ४ रुग्णांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. या आधी १० ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता.
जे रुग्ण दगावले त्यातील काही रुग्णांचा अपघातग्रस्त, तर काहींचा अल्सर, यकृत व्याधी, निमोनिया, विष प्राशन, डायलेसीस, डोक्याला मारहाण, लघवी संसर्ग, ऑक्सिजनची कमतरता, रक्तदाब कमी होणे, ताप आदींमुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मृतांमध्ये एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेसह ८१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर उर्वरितांमध्ये ३३ ते ८३ वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे.
> कळवा रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची
> साथीचे आजार आणि अतिरिक्त रुग्ण संख्येमुळे ती दीडशे-दोनशेहून अधिक झाली
> वॉर्डामध्ये जागा मिळेल तिथे बेड लावून रुग्णांवर उपचार सुरू
> एका वॉर्डमध्ये ४९ रुग्णांची क्षमता असताना सध्या ८९ रुग्णांवर एक परिचारिका उपचार
> एका वॉर्डमध्ये ४९ रुग्णांची क्षमता असताना सध्या ८९ रुग्णांवर एक परिचारिका उपचार
> रुग्णालयात दररोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, पालघर, उल्हासनगर, डोंबिवली, जव्हार, वाडा, भिवंडी अशा विविध भागांतून रुग्ण येतात