मुंबई : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत एका चारचाकी गाडीतून १.१४ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. दादरमध्ये निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. हा पैसा कुठुन आला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ऐन निवडणुकीच्या काळात इतका जास्त पैसा सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा पैसा कुठे नेला जात होता, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या स्टॅटिक सर्व्हेलिअन्स टीमने ही कारवाई केली आहे. वाहनचालक कॅश संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईमध्ये १.१४ कोटी रुपये रूपये जप्त करण्यात आले आहेत. रोकड जप्त केल्यानंतर केलेल्या चौकशीमधून महत्वाची माहिती समोर आली आहे. ही जप्त केलेली रोकड लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याची माहिती मिळत आहे. रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला दिली माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. सध्या राज्यात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे.