भंडारा : राज्यात सतत हत्या, अत्याचार, लैंगिक शोषणच्या घटना समोर येत आहे. या घटनांमुळेराज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. आता भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चॉकलेटचं आमिष देऊन दोन चिमुकलींवर एकानं लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अत्याचार करणारा नराधम हा अतुल बुराडे ३६ वर्षीय असून तो घराशेजारी राहत होता. त्याने चॉकलेटचा अमिश देऊन दोन ८ व ९ वर्षाच्या तरुणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अतुलने अनेक दिवस चॉकलेटचं आमिष दाखवत हा संतापजनक प्रकार केला असल्याचं समोर आला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. चॉकलेटचं आमिष दाखवत दोन चिमुकल्यांवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी करडी पोलिसांनी अतुल बुराडे (३६) या आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढरी या गावातील ही घटना असून आरोपी अतुल बुराडे याच्या घराशेजारी राहणाऱ्या ८ आणि ९ वर्षीय चिमुकलींसोबत मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.







