पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चारने दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात एक चारचाकी मोटार, १३ दुचाकी आणि दोन दुचाकींचे इंजन जप्त केले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चारच्या टीमने आर.एक्स हॅंडरेड ही दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. याप्रकरणी अक्षय उर्फ सोन्या काळुराम हुलावळे याला अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, दुचाकींची मोडतोड केल्यानंतर त्याचे भंगार विकत घेणाऱ्या समशेर इस्माईल सहा याला देखील अटक करण्यात आली आहे. उच्चशिक्षित असलेला अक्षय हुलावळे हा अल्पवयीन साथीदारासह शहरातील वेगवेगळ्या भागात असणाऱ्या आर.एक्स.हंड्रेड या दुचाकींना लक्ष करून त्या चोरायचा. मग त्या गाड्या मॉडीफाय करून अधिक किंमतीला विकत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. चोरी केलेली वाहन हुलावळे हा हिंजवडी येथे असलेल्या शेतातील गोठ्यात लपून ठेवायचा तसेच गाडी ओळखायला येऊ नये म्हणून नंबर प्लेटदेखील बदलत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आर.एक्स. हंड्रेड ही वाहन वगळता इतर वाहनांचे इंजिन, स्पेअर पार्ट विकायचे. अल्पवयीन मुलासह अक्षय ला अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींकडून ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आठ गुन्हे देखील उघड केले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नारायण जाधव, तुषार शेटे, प्रशांत सैद, प्रवीण दळे, सुखदेव गावंडे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, मोहम्मद गौस रफिक नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाय, संजय गवारे, दादा पवार, आबासाहेब गिरणारे, मिसाळ, रोहिदास आडे यांच्या टीमने केली आहे.