नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, कायदेशीर आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना मध्यरात्रीही सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या नागरिकावर कायदेशीर संकट आलं, तपास यंत्रणांकडून अटक करण्यात आली किंवा एखाद्याचे मूलभूत अधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य धोक्यात आले, तर अशा वेळी संबंधित व्यक्तीला मध्यरात्रीही घटनात्मक न्यायालयात सुनावणीची मागणी करता येईल. न्याय मिळण्यात वेळ ही अडचण ठरू नये, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. CJI सूर्यकांत यांनी सांगितलं की, “सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये ही लोकांची न्यायालये व्हावीत, हा माझा सातत्याने प्रयत्न राहील. कायदेशीर आणीबाणीच्या वेळी कामाच्या वेळेनंतरही नागरिक न्यायालयाशी संपर्क साधू शकतील, अशी व्यवस्था हवी.”






