• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निती आयोगाकडून एमएमआर विकास अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याचदृष्टीने राज्यात कामे सुरू आहेत. उद्योजकांची देखील महाराष्ट्राला पसंती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी निती आयोगासमवेत झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, निती आयोगाचे ओ. पी. अग्रवाल, प्रधान आर्थिक सल्लागार ॲना रॉय, शिरीष संखे, यांच्यासह मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. यावेळी निती आयोगाचे श्री. संख्ये यांनी मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी करण्यात आलेल्या अभ्यासाबाबत सादरीकरण केले. निती आयोग १३ राज्यांसाठी व्हीजन तयार करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी सांगितले. राज्याच्या विकासासोबतच शहरांच्या आर्थिक विकासावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसर, सुरत, वाराणसी, विशाखापट्टणम या चार महानगरांवर पथदर्शी प्रकल्प म्हणून निती आयोग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

निती आयोगाने केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. सध्या या परिसराचे सकल देशांतर्गत उत्पादन १२ लाख कोटी (१४० बिलियन डॉलर) असून ते उत्तरप्रदेश राज्याच्या ८० टक्के एवढे आहे. मुंबई आणि महानगर परिसराचा जीडीपी २०३० पर्यंत २६ लाख कोटी (३०० बिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. सुब्रमण्यम् यांनी  सांगितले. मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून सुमारे ३० लाख रोजगार अजून निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निती आयोगाने नमूद केले आहे. त्यासाठी सात विकास क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून त्यामध्ये  खासगी क्षेत्रामध्ये १० ते ११ लाख कोटी गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून शहरांना ग्रोथ इंजिन करण्यावर भर देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या एक तृतीयांश जीडीपी या पाच जिल्ह्यातून येत असल्याचे सांगत मुंबईत ग्लोबल सर्विसेस हब करणे, परवडणाऱ्या घरांना चालना देणे, एमएमआर परिसराला जागतिक पर्यटन केंद्र बनविणे, एमएमआरमधील बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योग आणि लॉजिस्टीक हब करणे, सुनियोजित शहरांचा विकास, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता तसेच जागतिक दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा अशा सात बाबींच्या आधारे एमएमआर परिसराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आर्थिक वृद्धीचा वेग वाढविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, मुंबईसह महानगर परिसरात असलेल्या संधीचा लाभ घेऊन एकात्मिक विकासासाठी नियोजन निती आयोगाने केले आहे. त्यासाठी परवडणाऱ्या घरांची उभारणी करणे, रोजगार निर्मितीवर भर देणे, नवी मुंबईत डेटा सेंटरला प्राधान्य देणे त्याचबरोबर अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोअरच्या उभारणीला वेग देण्यात येत आहे. नुकतेच महाराष्ट्रात सुमारे ८० हजार कोटींच्या गुंतवणुक प्रकल्पांना मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने उपयोग करून घेण्यासाठी देखील प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

मुंबईतील झाडांची प्रकाश प्रदूषणापासून मुक्तता

Next Post

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION