मुंबई : राज्यात बिबट्याची दहशत वाढली असतांना आता अनेक भागात माकडांनी उच्छाद मांडलाय. पुण्यात एका सोसायटीत शिरलेल्या माकडांच्या टोळीनं रहिवाशांना सळो की पळो करुन सोडलंय. आता मानव माकडांच्या या संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागानं अनोखी शक्कल लढवत माकडा पकडा आणि पैसे मिळवा ही योजना सुरु केलीये. मुंबईत जसं उंदिर पकडल्यावर कंत्राटी कामगारांना पैसे दिले जायचे तसंच आता माकडं पकडल्यावर वनविभागानं आपल्या कामाचं विकेंद्रीकरण करत जनतेलाच कामाला लावलंय.
माकड बचावासाठी सुरक्षितपणे १० माकडं पकडल्यास आणि त्यांना सुरक्षित सोडल्यास प्रती माकड ६०० रुपये मिळणार आहेत १० पेक्षा जास्त माकड जर पकडले तर प्रति माकड 300 रुपये देण्यात येतील. यावेळी एकावेळी १० हजारांपेक्षा जास्त आर्थिक सहाय्य मिळणार नसल्याचं देखिल सांगण्यात आलंय. ५ माकडं पकडण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तींना प्रवास खर्च मिळणार असून १ हजार रुपये प्रवासासाठी देण्यात येणारेयत. जास्त माकडं पकडले तरी वेगळा प्रवास खर्च मिळणार नाही. हे देखिल नमुद करण्यात आलंय. माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव हा गेल्या दोन अडिच वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यावर हालचाली करण्याऐवजी प्रशासनानं जनतेला कामाला लावलंय. माकडं पकडतांना आता तुम्हाला त्याचं व्हिडीओ रेकॉर्डींग देखिल करावं लागणारये. त्यामुळे वनविभागाला सहकार्य करुन माकडं पकडतांना आपलं माकड हाड मोडणार नाही ना? याची काळजी घ्या आणि खुश्शाल माकडं पकडा आणि पैसे कमवा.







