दहा लाखांची रेल्वेत नोकरीच्या आमिष देत फसवणूक; बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले.

पुणे : रेल्वेत नोकरीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या परिचितांना त्याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी त्याने तक्रारदाराकडे केली होती. त्यानंतर तक्रारदाराने राजगुरुला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले. दहा लाख रुपये दिल्यानंतर राजगुरुने नोकरी लावली नाही.

त्यानंतर राजगुरुने त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भेटायला बोलावले. तक्रारदाराच्या ईमेलवर त्याने रेल्वेत आरोग्य निरीक्षकपदावर नोकरी मिळाल्याबाबतचे बनावट नियुक्तीपत्र पाठविले. चौकशीत नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. तक्रारदाराने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published.

Follow US

Our Social Links

Recent News