• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांच्या परवानग्या रद्द; मनपा प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा

admin by admin
January 27, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : शहरातील प्रदूषणाला आळा बसावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या बांधकाम नियमावलीला वाटाण्याच्या अक्षता दाखवत मनमानी कारभार करणाऱ्या विकासकांना महापालिका प्रशासनाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. सुरुवातीला दंड आकारणी आणि वारंवार नोटिसा देऊनही बधत नसलेल्या विकासकांच्या बांधकाम परवानग्या यापुढे थांबविल्या जातील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे. नियमावलीचा भंग करणाऱ्या विकासकांकडून नगररचना विभागाने आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. नवी मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी केले जाणारे स्फोट, ध्वनी तसेच वायुप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या उपायांना दाखविल्या जाणाऱ्या वाकुल्या, वेळी-अवेळी सुरू राहणारी यंत्रांची धडधड, रस्ते अडवून उभी राहणारी बांधकाम साहित्याने भरलेली वाहने यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा ओघ सातत्याने वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यासंबंधी विशिष्ट अशी नियमावली तयार केली असून बांधकामांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना नगररचना विभागाने विकासकांना दिल्या आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात इमारतींचा पाया रचण्यासाठी केल्या जाणाऱ्या खोदकामांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी आणि वायुप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही बिल्डरांकडून नियमांची ऐशीतैशी करत सर्रास स्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे आसपासच्या इमारतींना हादरे बसू लागले असून घरांच्या भिंतींना तडे जाणे, प्लास्टर निखळणे असे प्रकार आता नित्याने होऊ लागले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंबंधी अलीकडे स्वत:हून दाखल करून घेतलेल्या याचिकेत काही आदेश दिले आहेत. त्यानुसार ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत.

नियमावलीचे पालन न केल्याबाबतच्या तक्रारी वाढू लागताच वेगवेगळ्या बांधकामांच्या ठिकाणी जाऊन महापालिकेने नेमलेल्या पथकांनी सविस्तर अहवाल नगररचना विभागाला सादर केले होते. त्यानुसार ८७ प्रकल्पांमध्ये बिल्डरांना महापालिकेने नोटिसा बजाविल्या होत्या. याप्रकरणी आतापर्यंत एक कोटी ४० लाख रुपयांचा दंड बिल्डरांना बजावण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाचे प्रमुख सोमनाथ केकाण यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान दंड आणि नोटिसा यासारखी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही काही बिल्डर आपल्या बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी महापालिकेने आखून दिलेली नियमांची अंमलबजावणी करत नसल्याचे निर्दशनास आले आहे. धूळ तसेच ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना, बांधकामांसाठी आखून दिलेल्या वेळा मोडणे, बांधकाम साहित्याची ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर धुळप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना टाळणे असे प्रकार सातत्याने होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ठरावीक रकमेचा दंड भरायचा आणि आपली मनमानी सुरूच ठेवायची, असे प्रकार घडू लागल्याने या प्रकारांची गंभीर दखल महापालिका आयुक्तांनी घेतली आहे. दंड आणि नोटिसा बजावूनही प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर बांधकाम प्रकल्पांची परवानगी थांबवली जाईल, अशा स्पष्ट सूचना बिल्डर संघटनेला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोमनाथ केकाण यांनी दिली. यासंबंधी आधी नोटिसा बजावल्या जातील आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. शहरातील प्रदूषण नियंत्रण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकताही केकाण यांनी व्यक्त केली. मानक नियमावलीची आखणी कागदावरच? न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून महापालिका प्रशासनाने यासंबंधीची एक मानक कार्यप्रणाली तयार करून ॲागस्ट २०२४ मध्ये प्रसिद्ध केली होती. या कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी केली जावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतरही शहरातील बहुसंख्य बिल्डरांनी महापालिकेच्या या नियमावलीला फारसे गांभीर्याने घेतले नाही.

 

 

 

 

 

 

 

 

Previous Post

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार की नाही?

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक व वैचारिक क्षेत्राची मोठी हानी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION