मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. मुंबई मध्ये त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांना लगेचच लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची बातमी कळताच सलमान खान याने रूग्णालयात धाव घेतली. आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तब्बल २५ लोकांना पोलिसांनी अटक केलीये. अजूनही हा आकडा वाढण्याची दाट शक्यता असल्याचेही सांगितले जातंय. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय. पंजाबमधून अटक करण्यात आलेल्या आकाशदीप गिलने धक्कादायक माहिती पोलिस चाैकशीत सांगितलीये. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, कामगारांकडून हॉटस्पॉट्स घेऊन तो टोळीच्या संपर्कात असायचा. ही शक्कल तो पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवत असे. पोलिसांनी आकाशदीप गिलला पंजाबच्या फाजिल्का येथून अटक केली आहे. आता त्याच्याकडून कसून चाैकशी केली जातंय.
मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या चाैकशीत त्याने कबूल केले की, तो बलविंदर नावाच्या मजुराचा हॉटस्पॉट्स वापरत. सध्या पोलिसांकडून आकाशदीपच्या मोबाईलचा शोध हा घेतला जातोय. कारण त्याच्या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे असू शकतात, असे पोलिसांना वाटते. अनमोल बिश्नोई याच्या हत्येचा कट रचण्यासाठी मुख्य समन्वयक म्हणून गिलची ओळख पटली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशदीप गिलने बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये शूटरला मदत केली. पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी म्हटले की, अटक करण्यात आलेला आरोपी आकाश दीप गिल हा लॉरेन्स बिश्नोई टोळीला मदत करत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या शूटर्सला तो मदत करत होता. पोलिस याप्रकरणी अजून काही मोठे खुलासे करू शकतात. दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला देखील अटक करण्यात आलीये. हा बिश्नोई टोळीला मोठा धक्काच म्हणाला लागेल.