मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे रेकॉर्डिंग होणार आहे. निवडणुक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. २६ नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला मजमोजणी होणार आहे. यानंतर महाष्ट्रात नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. निवडणुकांचा तारखा जाहीर करताना निवडणुक आयोगाने काही निर्णय जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात ऑन कॅमेरा मतदान होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे रेकॉर्डिंग होणार आहे. विधानसभा निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमे-याची नजर असणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येणार आहे. गैरप्रकारांवर व्हिडिओ कॅमे-यातून नजर ठेवणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. एखाद्या मतदान केंद्रावर काही संशयास्पद कृती आढळून आल्यास किंवा त्याप्रकारची शंका दिसून आल्यास तात्काळ व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासले जाणार आहे. महाराष्ट्रात होणार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. तसेच महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. २०.९३ लाख नवमतदार, ४.९७ कोटी पुरुष मतदार, ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. या निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत मतदारांना व्होटर ॲपवर नावं शोधता येणार आहे. तसेच ज्येष्ठांना घरातून मतदान करता येणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलंय.. तदारांची गैरसोयी टाळण्यासाठी मतदारांसाठी रांगेत खुर्च्यांची सोय करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय…जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलंय.तृतीय पंथीय, वृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी विशेष व्यवस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.