• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

२०२२ साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 23, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता सा‍हित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अकादमीचे सचिव, श्री के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकस मार्ग स्थित रविंद्र सभागृहात वर्ष २०२२ साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २३ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

प्रवीण बांदेकर यांच्या लेखनकार्याविषयी –
मूळचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील प्रसिध्द लेखक, श्री प्रवीण दशरथ बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी करिता साहित्य अकादमी पुरस्कार २०२२ साठी जाहीर झाला. त्‍यांनी इंग्रजीत शिक्षण घेतले असून, त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून लेखनाला सुरूवात केली असून त्यांची चाळेगत कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून लेखन कार्य करत आलेल्या श्री बांदेकर यांनी त्यांच्या कादंबरीत कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते, धार्मिक व राजकीय अनुभव बाहुल्यांच्या माध्यमातून कथन केले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व साहित्याच्या माध्यमातून कथन केलेले अनुभव, वेग-वेगळ्या समस्या जास्तीत-जास्त लोकांसमोर येतील, अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

प्रमोद मुजुमदार यांच्या लेखनकार्याविषयी –
सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी, श्री प्रमोद मुजुमदार यांना आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आला. मूळचे पुण्याचे श्री प्रमोद श्रीनिवास मुजुमदार यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. वर्ष १९९९ पासून मुक्त पत्रकार म्हणून कारकीर्द आरंभ करत, त्यांनी दैनिक महानगर, साप्ताहिक कलमनामा या नियतकालिकांत पंधरा वर्षे लिखण केले व आरोग्य, शहरीकरण आणि पर्यावरण इ विषयांवर स्तंभ लेखन करत आले आहेत. सध्या ‘सलोखा संपर्क गटात’ त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत. अस्तित्वाचे प्रश्न, गुजरात पॅटर्न, आरोग्याचा बाजार, (अनुवाद आणि रूपांतर), सलोख्याचे प्रदेश (अनुवाद), दास्ताँ-ए-जंग सारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ पुस्तक, श्री मुजुमदार यांनी इंग्रजी पुस्तक, ‘इन गुड फेथ’ या मूळ पुस्तकाचा मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे. प्रख्यात लेखिका श्रीमती सबा नक्वी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. श्रीमती नक्वी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी व मणीपूर ते महाराष्ट्रात असलेल्या सार्वजनिक धार्मिक स्थळांना व लोकप्रिय दैवतांचे दर्शन घेवून, मंदिरांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचा सार्वत्रिक सलोख्यासाठी पुस्तकात इतिहास मांडला आहे. या पुस्तकाचा अनुवाद श्री मुजुमदार यांनी केला असून त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी –
ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रख्यात साहित्यिक प्रो. भालचंद्र नेमाडे व प्रसिद्ध लेखक नितीन रिंधे या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रोख रक्कम तसेच अनुवादनासाठी निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना ५० हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचे वितरण ११ मार्च २०२३ रोजी कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्याबाबतची माहिती, सचिव श्री के. श्रीनिवासराव यांनी दिली. तसेच अनुवादाबाबतचे पुरस्कारांच्या वितरणाबाबतची तारीख निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल, असे यावेळी सांगितले.

Previous Post

राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Next Post

व्यापाऱ्यांना लुटणारी कुमावत गँग अखेर जेरबंद; मुंबई पोलिसांची कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

व्यापाऱ्यांना लुटणारी कुमावत गँग अखेर जेरबंद; मुंबई पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION