• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!

admin by admin
June 20, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान AI प्रशिक्षणासाठी करार;४ लाख शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानासंबंधी प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत या उद्देशपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गुगल फॉर एज्युकेशनच्या वतीने विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स, तर शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव श्री. ताशीलदार यांनी करारावर स्वाक्षरी केली. या उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण राबविण्यात येणार असून सुरुवातीला निवडक मार्गदर्शक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक डिजिटल साधनांचे प्रशिक्षण पोहोचविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढल्यास विद्यार्थ्यांपर्यंतही आधुनिक शिक्षण प्रभावीपणे पोहोचेल. विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. शासकीय तसेच अनुदानित शाळांतील शिक्षकांना अत्याधुनिक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सहकार्यामुळे शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता वाढविणे, डिजिटल कौशल्यांचा विकास करणे आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रसार करणे शक्य होणार आहे. प्रशिक्षणासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये स्थानिक गरजांनुसार तयार करण्यात आलेली अभ्याससामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख प्रदान करणे, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणे यावरही भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच माहिती व दळणवळण तंत्रज्ञान प्रयोगशाळा, जोडलेल्या वर्गखोल्या, स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधांना बळकटी मिळणार आहे. राज्यातील लाखो शिक्षकांना नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण देत शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, परिणामकारक आणि भविष्योन्मुख बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शिक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Previous Post

शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात काळ्या कपड्यांना बंदी; प्रवेशद्वारावर पोलिसांची कसून तपासणी!

Next Post

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

admin

admin

Next Post
विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

विधान भवनाचा सुरक्षायंत्रणेत ऐतिहासिक बदल; छापील प्रवेशपत्रांना पूर्णविराम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (476)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,772)
  • मुंबई (3,332)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (492)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण, आरोग्य व समाजसेवेतील युगाचा अस्त

August 4, 2026
राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 4, 2026
सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना! राष्ट्रवादीच्या घटनेतील दुरुस्तीची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

August 3, 2026
राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

राज्यात ‘धर्मस्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू!

August 3, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION