पुणे : कल्याणीनगर येथील अपघातानंतर रेस्टॉरंट, पबसाठी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्नही ऐरणीवर आल्याने महापालिकेने गेल्या महिन्याभरात ८५ रूफटॉप आणि ५५ तळमजल्यावरील रेस्टॉरंट, पबवर कारवाई केली. यात ३ लाख ६० हजार चौरस फुटांचे बांधकाम पाडून टाकले आहे. तर अनधिकृत बांधकाम केल्याने २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे पुणे शहरातील इमारतींच्या गच्चीवर रूफटॉप हॉटेल सुरू करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खराडी, वडगाव शेरी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, बिबवेवाडी, महंमदवाडी, सिंहगड रस्ता आदी भागात रूफटॉप हॉटेलचे मोठे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकाम असूनही तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे दारू विक्रीचा परवाना देण्यात येत आहे. तर अनधिकृत बांधकाम केल्याने २१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे पुणे शहरातील इमारतींच्या गच्चीवर रूफटॉप हॉटेल सुरू करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.
बाणेर, बालेवाडी, कोथरूड, खराडी, वडगाव शेरी, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, हडपसर, बिबवेवाडी, महंमदवाडी, सिंहगड रस्ता आदी भागात रूफटॉप हॉटेलचे मोठे पेव फुटले आहे. अनधिकृत बांधकाम असूनही तेथे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे दारू विक्रीचा परवाना देण्यात येत आहे. मंजूर टेबल, खुच्यपिक्षा व निश्चित केलेल्या ठिकाणाशिवाय हॉटेलच्या आवारात इतरत्र दारू विक्री केली जात आहे. या हॉटेलमुळे निवासी भागात रात्री उशिरापर्यंत गोंधळ व वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत अनेक तक्रारी येऊन देखील महापालिका, पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती. कल्याणीनगर येथे मद्यधुंद अल्पवयीन मुलाने महागडी पोर्श गाडी चालवून दोघांचा बळी घेतला, याप्रकरणानंतर शहरातील रूफटॉप हॉटेल, रेस्टॉरंटवर कारवाई सुरू झाली. बांधकाम विभागाने पुणे पोलिसांना ८९ अनधिकृत रूफटॉपची माहिती दिली होती. पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही. अखेर महापालिकेनेच कारवाई सुरू करून त्यापैकी ८५ ठिकाणी कारवाई पूर्ण केली आहे. तर तळमजल्यावर सुरू असलेल्या ५९ हॉटेलवरही बुलडोझर चढवून अनधिकृत बांधकाम, शेड पाडून टाकले आहेत. वारंवार अनधिकृत बांधकाम करून हॉटेल सुरू करणाऱ्या हॉटेलमालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिकेने अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्यांपैकी केवळ २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. १४४ अनधिकृत रूफटॉप हॉटेल, रेस्टॉरंटवर महापालिकेने कारवाई करून ३.६० लाख चौरस फुटांचे बांधकाम पाडून टाकले आहे. ज्या ठिकाणी परवानगीशिवाय अंतर्गत बदल केले आहेत, तेथे महापालिका नोटीस देऊन कधीही कारवाई करू शकते. अंतर्गत बदल करायचे असतील, तर परवानगी घेणे गरजेचे आहे. आधी बदल करून नंतर प्रस्ताव टाकणे योग्य नाही, अशा ठिकाणी कारवाई करू.