पिंपरी : हिंजवडी परिसरातील पगार टोळी, भोसरी परिसरातील दळवी टोळी आणि पिंपरी परिसरातील काळे टोळी या तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अन्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. चालू वर्षात शहरातील २५ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १४८ गुन्हेगारांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी परिसरातील टोळी प्रमुख सचिन साहेबराव पगार (वय ३१, रा. नाशिक), दिपक भगवान जाधव (वय २६, रा. चाकण पुणे. मुळ रा. मु.पो. पाथरी, ता.जि. जळगाव), योगेश शिवाजी दाभाडे या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील टोळीप्रमुख ओमकार मल्हारी दळवी (वय २२, रा. दिघी पुणे), योगेश जगन्नाथ मुळे (वय २१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे), गणेश कृष्णा गवारी (वय १९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे), विजय विरेंद्र चव्हाण (वय १९, रा. सदगुरुनगर, भोसरी पुणे), सचिन ऊर्फ पिरप्पा जगन्नाथ येरे (वय २०, रा. धावडे वस्ती, भोसरी पुणे), तेजस चंद्रकांत डोंगरे (वय २२, रा. धावडे वस्ती, भोसरी पुणे) या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. टोळीप्रमुख आणि त्याच्या साथीदारांवर सात गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी परिसरातील टोळीप्रमुख सुप्रिम राजु काळे (वय २४, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे), अविनाश सुभाष पात्रे (वय १९, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे), विनायक दयानंद क्षिरसागर (वय २०, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे), सुरेश काटे (रा. शंकरनगर, चिंचवड) या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर सात गुन्हे दाखल आहेत.वरील तीनही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेऊन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी गुन्हे केले आहेत. आरोपींनी हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, महाळुंगे एमआयडीसी, पिंपरी, निगडी, गंगापुर, म्हसरुळ पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा घालणे, पळवून नेऊन जबरी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनाची तोडफोड करणे, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्रे व जिवघेणे हत्यारे जवळ बाळगणे, घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे केले आहेत. या तीन तोळ्यांवर मोकांतर्गत कारवाईचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त बापु बांगर, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात, नितीन फटांगरे, अशोक कडलक, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, उपनिरीक्षक श्री केंद्रे, पोलीस अंमलदार उभे, ओंकार बंड, कौटेकर, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली आहे.