मुंबई : भारतीय रेल्वेच्या सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा अंतर्गत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पोलिसानी मोठी कारवाई केली आहे. महिन्याभरात अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या ६४ जणांवर कारवाई केली. त्याच्याकडून तेरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. सिगारेट तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाँया विरोधात मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. भारतीय रेल्वे कायदा आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (सीओटीपीए)-२००३ च्या कलम १४५ (ए, बी आणि सी) अंतर्गत एप्रिल २०२४ मध्ये मुंबई विभागात एकूण ६४ प्रकरणे नोंदवली आहे.
या प्रकरणातून १२ हजार ८०० रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. रेल्वेच्या आवारात कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीच तत्पर असतात आणि मुंबई विभागाचे रेल्वे सुरक्षा दलाने आपली शिस्त आणि कायद्याच्या अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण महिन्याभराचा कामगिरीवरून दिसून येते आहे.