नवी दिल्ली : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. या मेगा आयसीसी स्पर्धेची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यासाठीचे वेळापत्रकही आयसीसी आणि बीसीसीआयने जाहीर केले आहे. ८ ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला विश्वचषक सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे होणार आहे. मात्र, वेळापत्रक आले, तोपर्यंत केवळ ८ संघ विश्वचषकात पात्र ठरले होते. पण आता विश्वचषकासाठीचे १० संघही पात्र झाले आहेत, पाहूया यानंतर कसं आहे भारताचे वेळापत्रक.
झिम्बाब्वेमध्ये विश्वचषक पात्रता सामने खेळवले गेले आहेत, त्यापैकी दोन संघ विश्वचषकासाठी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. श्रीलंका आणि नेदरलँड्स हे दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतील दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेने आधीच पात्रता मिळवली होती. तर नेदरलँडने स्कॉटलंडला हरवून हा पराक्रम केला आहे. भारत आता २ नोव्हेंबरला मुंबईत श्रीलंकेशी आणि ११ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये नेदरलँडशी सामना करेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका, २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू





