• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home जालना

“हा माझा शेवटचा लढा…” मनोज जरांगे आजपासून मैदानात; मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा

admin by admin
August 29, 2026
in जालना, महाराष्ट्र, मुंबई
0
“हा माझा शेवटचा लढा…” मनोज जरांगे आजपासून मैदानात; मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सकाळी १० वाजता उपोषणाला सुरुवात झाली असून, त्याआधी ते गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळचे आंदोलन हे अंतिम आणि निर्णायक असल्याचा दावा जरांगे यांनी केला असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस आणि अंतिम निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. “आता सरकारला सुट्टी नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांनी २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत वैद्यकीय रजा वगळता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत. बाहेरील जिल्ह्यांतून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असून अंतरवाली सराटीसह संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनासमोर आंदोलन शांततेत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखणे, असे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करताना जरांगे यांनी मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असेही भावनिक आवाहन केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर टीका करत, “मी जरांगेंना भाव देत नाही. सरकार आणि जरांगे यांच्यातील संघर्षाशी आमचा संबंध नाही. मात्र ओबीसींच्या वाट्याचे आरक्षण कोणालाही देऊ नये,” अशी भूमिका मांडली. त्यांनी ईडब्ल्यूएसप्रमाणे स्वतंत्र आरक्षणाचा पर्याय स्वीकारण्याची सूचनाही केली. दुसरीकडे, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांना काही नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचा दावा केला आणि त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करून तातडीने अटक करण्याची मागणी केली. यावर प्रत्युत्तर देताना मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी उलट सदावर्ते यांनाच अटक करण्याची मागणी केली. तसेच, गरज पडल्यास मुंबईकडे मोर्चा काढण्यासाठी ‘बी प्लॅन’ तयार असल्याचा दावाही त्यांनी केला. मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ५८ लाख मराठा नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देणे, मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करणे, स्वतंत्र मराठा-कुणबी मंत्रालयाची स्थापना, सारथी संस्थेच्या बंद योजना पुन्हा सुरू करणे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याची रक्कम वितरित करणे या मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावर जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सरकार आणि मराठा आंदोलनकर्त्यांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

विद्यापीठांतून युनिकॉर्न आणि नवे उद्योग घडले पाहिजेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज्यात सुट्या म्हशीच्या दुधाचे दर वाढणार; १ सप्टेंबरपासून घाऊक दर ९३ वरून १०२ रुपये!

admin

admin

Next Post
राज्यात सुट्या म्हशीच्या दुधाचे दर वाढणार; १ सप्टेंबरपासून घाऊक दर ९३ वरून १०२ रुपये!

राज्यात सुट्या म्हशीच्या दुधाचे दर वाढणार; १ सप्टेंबरपासून घाऊक दर ९३ वरून १०२ रुपये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,109)
  • गॅलरी (5)
  • जालना (7)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (81)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,035)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,906)
  • मुंबई (3,414)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (514)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0

August 29, 2026
गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

गोविंदांनंतर आता गणेश भक्तांनाही मिळणार विमा कवच? राज्य शासनाकडून सुरक्षा कवच देण्याची सूचना

August 29, 2026
दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

दहीहंडीतील थराराला विम्याचे कवच! थर कोसळल्यास गोविंदांना मिळणार १० लाखांचे आर्थिक संरक्षण

August 29, 2026
भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

भेसळयुक्त खाद्यतेलाचा राज्यव्यापी सुळसुळाट? ११.८२ लाखांचा साठा जप्त; ४ हॉटेल्सना थेट टाळे!

August 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION