• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

admin by admin
July 27, 2026
in वसई-विरार
0
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या धबधबे, समुद्रकिनारे आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त अशोक विरकर यांनी जारी केलेला हा आदेश ३ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या काळात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि इतर परिसरांतून मोठ्या संख्येने पर्यटक वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देतात. मात्र, अतिवृष्टी, वेगवान पाण्याचा प्रवाह, घसरडे खडक आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटना लक्षात घेता नागरिकांच्या जीवित व वित्तहानीची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वसई, नायगाव आणि वालीव पोलीस ठाण्यांकडून वाढती गर्दी व संभाव्य अपघातांचा धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा आदेश लागू करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टिंगलटवाळी, अश्लील हावभाव, शेरेबाजी किंवा लज्जास्पद वर्तन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात संबंधित पर्यटनस्थळांवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून, पावसाच्या पाण्यात उतरून पोहणे, खोल पाण्यात जाणे, धबधब्याखाली बसणे, धोकादायक ठिकाणी किंवा कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढणे अथवा चित्रीकरण करणे यावरही बंदी असेल. तसेच मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, अनधिकृत मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे किंवा बेदरकार वाहन चालविणे यावरही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या आदेशानुसार वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच, भुईगाव बीच, बेनापट्टी बीच, वसई किल्ला जेटी आणि पाचूबंदर जेटी, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी धबधबा आणि कामण देवकुंडी, तसेच वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली खदान आणि खैरपाडा-धुमाळनगर खदान परिसराच्या १०० मीटरच्या परिघात हे निर्बंध लागू राहणार आहेत. पर्यावरण संवर्धनालाही या आदेशात विशेष महत्त्व देण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल किंवा इतर कोणताही कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कोणत्याही कृतीवर बंदी घालण्यात आली असून, मोठ्या आवाजात डीजे, संगीत यंत्रणा किंवा वाहनांमधील स्पीकर वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी पर्यटन करण्याचा मोह टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मान्सूनच्या काळात वाढणाऱ्या अपघातांना आळा घालणे, पर्यटकांचे प्राण वाचवणे, महिलांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या प्रतिबंधात्मक आदेशामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

बंदी घालण्यात आलेली प्रमुख प्रसिद्ध पर्यटनस्थळे:

१. समुद्रकिनारे

  • सुरुची समुद्रकिनारा
  • रानगाव समुद्रकिनारा
  • भुईगाव समुद्रकिनारा
  • बेनापट्टी समुद्रकिनारा
  • ब्राह्मणपाडा समुद्रकिनारा
  • अर्नाळा समुद्रकिनारा
  • कळंब, नवापूर आणि राजोडी समुद्रकिनारा

२. धबधबे आणि खदाणी

  • चिंचोटी धबधबा
  • तुंगारेश्वर धबधबा
  • कामण येथील देवकुंडी धबधबा
  • राजावळी खदाण (खाण परिसर)

३. धरणे आणि तलाव

  • फुलपाडा धरण
  • पेल्हार धरण
  • तानसा नदी परिसर
  • कुंभारपाडा तलाव
Previous Post

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

Next Post

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

admin

admin

Next Post
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (11)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,969)
  • मुंबई (3,448)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

‘लाडकी बहीण’ योजनेसारखाच अमेरिकेत धमाका; निवडणुका जिंकल्यास प्रत्येक नागरिकाला मिळणार ५,००० डॉलरचा ‘ट्रम्प डिव्हिडंड’!

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION