मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट (सीएसएमआयए)ने टर्मिनल २ (टी२) येथे १४ हायब्रिड सेल्फ बॅग ड्रॉप (एसबीडी) काऊंटर्स सुरू केले आहेत, जे तंत्रज्ञान-केंद्रित सोल्यूशन्सच्या माध्यमातून डिपार्चर प्रक्रिया सहजसाध्य करण्यामध्ये महत्त्वाचे पाऊल आहे. लाँच करण्यात आलेले हायब्रिड एसबीडी काऊंटर्स २०२८ पर्यंत सर्व २१२ विद्यमान चेक-इन डेस्क्सचे टप्प्याटप्प्याने हायब्रिड स्वरूपात बदल करण्याच्या सीएसएमआयएच्या योजनेचा भाग आहेत. या उपक्रमाचा टर्मिनलमधील जागेचा उत्तमपणे वापर करण्याचा, सामान प्रक्रिया क्षमता वाढवण्याचा आणि गर्दीच्या, तसेच कमी गर्दीच्या काळात प्रवाशांचे उत्तम व्यवस्थापन करण्याचा मनसुबा आहे.
विमानतळावर सेल्फ-सर्विस बॅगेज सुविधांच्या अवलंबनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर हे काऊंटर्स लाँच करण्यात आले आहेत. ऑटोनॉमस एसबीडी वापरामध्ये कॅलेंडर वर्ष २०२४ मधील ३८८,४४६ प्रवाशांच्या तुलनेत वार्षिक ४० टक्क्यांनी वाढून कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये ५६०,२७५ प्रवाशांपर्यंत वाढ झाली, ज्यामधून जलद व अधिक सुलभ प्रवासी प्रक्रियेला साह्य करण्याकरिता विकासात्मक पायाभूत सुविधेसाठी गरज दिसून येते. एकाच प्रक्रियेमध्ये चेक-इन व बॅगेज ड्रॉपला एकीकृत करत हायब्रिड एसबीडी काऊंटर्स मॅन्युअल हस्तक्षेप कमी करतात, तसेच प्रवाशांचया प्रतिक्षा वेळ देखील कमी होतो. ही यंत्रणा पात्र प्रवाशांना त्याच काऊंटरवर सामानाशी संबंधित पेमेंट व्यवहार पूर्ण करण्याची सुविधा देते, ज्यासह प्रक्रिया सुव्यवस्थितपणे होते आणि स्वतंत्र एअरलाइन डेस्क्सवरील अवलंबन कमी होते. सेल्फ-सर्विस मोडमध्ये सिंगल हायब्रिड एसबीडी काऊंटर समकालीन मॅन्युअल प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या २५ ते ३० प्रवाशांच्या सामानांच्या तुलनेत प्रतितासाला जवळपास १०० ते १२० प्रवाशांच्या सामानाला हाताळू शकते, ज्यामुळे सामान हाताळणी क्षमतेमध्ये जवळपास चारपट वाढ होते. या सुधारणेमुळे सामान स्वीकारण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल, प्रवाशांची ये-जा अधिक सुलभ होईल आणि टर्मिनलच्या पायाभूत सुविधांचा अधिक कार्यक्षम वापर होईल.







