मुंबई : मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महिला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी वसतीगृहाच्या ठिकाणी कॅमेरे आणि चांगली लॉकींग सिस्टीमला प्राधान्य दिलेच पाहिजे अशी मागणीच खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सरकारकडे आज एका पत्रकार परिदेत केली आहे.
केंद्र आणि राज्यातील सरकारे महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर दिसत नाही.आता तर सातत्याने मुलीं आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटना देशभर सातत्याने घडत असतांना त्याबाबतचा केंद्र व राज्यसरकारचा दृष्टीकोन सदोष आहे असेही सुळे म्हणाल्या. ज्याने अमानुष्य कृत्य केले त्याने आत्महत्या केली आहे त्यामुळे आता पहिल्यांदा वसतीगृहाची सुरक्षितता, त्यामध्ये हेल्पलाईन असतील, अलार्म बेल आणि कॅमेरे यांना प्राधान्य देत सरकारने लवकर पाऊले टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडली आहे.
केंद्र सरकारच्या अशा महिला विरोधी धोरणामुळे देशातून प्रचंड विरोध होतो आहे हे आता भाजपच्या लक्षात आले आहे. आंदोलन करणार्या पहेलवान मुलींचे गार्हाणं ऐकायला इतके दिवस का लागले? याचा अर्थ त्यांना अपयश दिसत आहे, देशातून रोष दिसत आहे. या देशातील प्रत्येक महिलेला राग आला आहे. ज्या सरकारने ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ चा नारा दिला त्यांनी त्यांच्या बेटीला न्याय दिला नाही. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाजपच्या विरोधात द्वेष आणि राग आहे. आंदोलनकर्त्या मुलींवरील अन्याय केला आहे ही चूक भाजपच्या लक्षात आल्यावर शेवटी ‘देर आये दुरुस्त आये’ असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपला लगावला.





