वृत्तसंस्था : आशिया कपच्या सुपर-४मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. काल पावसामुळे थांबवण्यात आलेला सामना आज पुन्हा सुरु झाला. भारताला काल रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात करून दिली होती. शर्मा-गिल जोडीच्या शतकी भागिदारीनंतर केएल राहुल आणि विराट कोहली मैदानावर आले होते.
मॅचच्या दुसऱ्या दिवशी या दोघांनी पहिल्या दिवसाची लय बिघडू दिली नाही. दोघांनी धावांचा वेग कायम ठेवला. राहुल-विराट जोडीने द्विशतकी भागिदारी केली. दरम्यान रन मशिन विराट कोहलीने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. विराटने पाकिस्तानविरुद्ध ९८ धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. पाकिस्तानविरुद्ध ९० धावा करताच विराटच्या वनडे क्रिकेटमधील १३ हजार धावा पूर्ण झाल्या. इतक नाही तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करण्याची कामगिरी विराटने केली. याबाबत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने १३ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ३२१ डाव खेळले होते. तर विराटने हीच कामगिरी फक्त २६७ डावात पार केली.
१) सचिन तेंडुलकर- १८ हजार ४२६
२) कुमार संगकारा- १४ हजार २३४
३) रिकी पॉन्टिंग- १३ हजार ७०४
४) सनथ जयसूर्या- १३ हजार ४३०
५) विराट कोहली-१३ हजार धावा
विराट कोहलीने याआधी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, १० हजार, ११ हजार आणि १२ हजारचा टप्पा पार करण्याची कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरनंतर वनडे क्रिकेटमध्ये १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट हा फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. १३ हजार धावांचा विक्रम करण्याआधी विराटने या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावांचा टप्पा पार केला.