पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. विनापरवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, बेशिस्त वाहन वाहन चालवणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांवर भारती विद्यापीठ वाहतूक पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
सदरील कारवाई ही पोलीस आयुक्त पुणे व वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त विवेक कुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात करण्यात येत असून भारती विद्यापीठ वाहतूक शाखेच्या वतीने परिसरातील सरहद चौक, कात्रज चौक, त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ चौक आदी ठिकाणी कारवाई करून शाळकरी विद्यार्थ्यांना समजूत देत जनजागृती करण्यात आली.
शाळकरी विद्यार्थ्यांकडून नेहमीच अशा प्रकारे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. अशाप्रकारे वाहन चालवण्याने अनेक अपघात व त्यांच्या जीवितास हानी देखील पोहोचली जाते. अल्पवयीन मुले देखील मोटार सायकल चालवत असतात याकडे पालकांनी, संबंधित शाळेतील शिक्षकांनी व स्वतः पाल्यांनी देखील काळजी घ्यायला हवी असे प्रसार माध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते