कल्याण : ईद ए मिलाद निमित्त ठिकठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली होती. आता कल्याणमध्ये ईद ए मिलाद निमित्त करण्यात आलेल्या रोषणाईच्या संदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विद्युत रोषणाई शेजाराच्या लाईट मीटरमधून कनेक्शन घेऊन करण्यात आली होती. ईद ए मिलादचा सण साजरा झाला. त्यानंतरही रोषणाई सुरुच होती. लाईट मीटरमधून रोषणाईचे कनेक्शन काढले गेले नाही. त्यामुळे विजेचे बील वाढतेय. या कारणावरुन कनेक्शन शेजाऱ्याने काढले. याचा राग धरुन तीन तरुणींनी शेजाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्व भागात घडली आहे. नवशाद हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुर्शीद शेख, आलम शेख, तौहीद सैय्यद या तिघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरामध्ये फैजू चाळीत राहणारे नौशाद खान यांच्या लाईट मीटरमधून ईद ए मिलादच्या निमित्ताने वीजेचे कनेक्शन घेऊन विद्युत रोषणाई करण्यात आली. हा सण संपला तरी विद्युत रोषणाई सुरुच होती. जास्त लोड आल्याने नौशाद यांचा लाईट मीटर जळाला. एकीकडे जास्तीचे बिल येत होते. तसेच मीटरही जळाला. हा खर्च कोण भरणार, या कारणास्तव नवशाद त्यांच्या लाईटमीटर मधून घेण्यात आलेले रोषणाईचे कनेक्शन काढले. याचा राग मनात धरुन परिसरातील नवशाद खान यांना जाब विचारला त्यांनी सांगितले की, सण संपला. आत्ता लाईट कनेक्शनमुळे वीजेचे बील वाढते. वाढीव लाईट बील कोण भरणार. त्यामुळे कनेक्शन काढले आहे. हे ऐकताच तीन तरुणांनी नौशाद यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत नौशाद खान हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली. कोळसेवाडी पोलिसांनी नौशाद यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तीन जणांना अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.