मुंबई : मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या पाच जणांच्या एका कुटुंबाला कांदिवली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, फातिमा खातून मोहम्मद हबीबूर रेहमान अन्वरअली प्रधानिया ऊर्फ शेख, हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख, अल्लाउद्दीन हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख आणि सल्लाउद्दीन हबीबूर रेहमान प्रधानिया ऊर्फ शेख अशी या पाच जणांची नावे आहेत. त्यांना अटक केल्यानंतर बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. हे बांगलादेशी कुटुंब कांदिवलीच्या इस्लाम कंपाऊंडमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या एटीएस पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश घाडगे, अंमलदार शरद गावकर, शिवाजी नारनवर, सचिन दिसले, प्रशांत कुंभार, योगेश हिरेमठ, कपिला बेहूर चौकशी करून या कुटुंबाला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बांगलादेशातील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून ते पळून आले होते.