• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

एवढी युती कच्ची नाही, एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होईल – मुख्यमंत्री शिंदे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 17, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : ‘एका विचाराने शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या संकल्पनेतून ही युती पुढे आली आहे. एखाद्या जाहिरातीमुळे युतीवर काही परिणाम होईल, एवढी युती कच्ची नाही,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  स्पष्ट केले. ‘आम्ही मजबूत असून सरकारची काही काळजी करू नका,’ असेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचे वाटप झाले. या वेळी ते बोलत होते. थेरगाव येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार संजय भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मी आणि देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहोत. धाडसी निर्णय घेणारे हे धाडसी सरकार आहे. करोना काळातील सर्व निर्बंध उठवले. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे हेच माझे आणि सरकारचे एकच काम आहे. आमचे सरकार खोटे काम करणारे नाही. खोटी आश्वासने देत नाही.’

लोकप्रतिनधी व प्रशासन एका रथाची दोन चाके आहेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींचे ऐकले पाहिजे. ते लाखो लोकांतून निवडून येतात. अधिकाऱ्यांनी ‘इगो’ ठेवू नये. दोघांनी मिळून काम केले पाहिजे. आतापर्यंत राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत सरकार पोहोचले आहे. १०४ शिबिरांच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे‘विद्यमान राज्य सरकार वेगवान असून, २४ बाय ७ अॅक्शन मोडमध्ये काम करणारे आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निगडी येथे उभारलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अण्णा बनसोडे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे आदी या वेळी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वर महाराजांच्या कार्याचा गौरव करून मुख्यमंत्री म्हणाले, ‘समता, बंधुता तत्त्वांशी तडजोड न करता बसवेश्वर महाराजांनी लौकिक निर्माण केला. ते प्रेरणा आणि ऊर्जास्थळ आहेत. त्यांनी बाराव्या शतकातच संसदीय लोकशाहीचा पाया घातला. श्रम हीच पूजा मानून श्रमाधारित व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे लंडनमध्येही त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.’ ‘रखडलेल्या राज्यातील प्रकल्पांना गती देण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. नागरिकांसाठी नियमांमध्ये बदल केले असून, अधिकारी वर्गही काम करण्यासाठी धावू लागला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना देशात अनेक चांगल्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. पुतळा समितीचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिल्पकार पंकज तांबे आणि वास्तुविशारद सचिन शहा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयुक्त शेखर सिंह यांनी केले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आभार मानले. संदीप साकोरे आणि भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. ‘मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत नालेसफाई झाली की नाही, हे मी अगदी जागेवर जाऊन पाहिले. राज्यात कुठेही गाडी थांबवून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पहिला आहे का, मला इगो नाही, मी रस्त्यावरील कार्यकर्ता आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांसाठीचा ४६० कोटी रुपयांचा शास्तीकर माफ केला. याशिवाय २०१८ ते २०२३ पर्यंतचे विकास आणि बांधकामाचे अतिरिक्त विकास शुल्कही १०० टक्के माफ केले असून, एप्रिल २०२३ पासून क्षेत्रनिहाय तपासून आकारणी करण्याचा निर्णय घेतला. मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच एकर जागा देणे, प्राधिकरण बाधित झालेल्या भूमिपुत्रांचा प्रश्न सोडविण्याची भूमिका आम्ही घेतली असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

Previous Post

पाच लाख ७८ हजाराचा दंड एक तासात वसूल; कल्याण-डोंबिवलीत ६०० वाहन चालकांवर कारवाई

Next Post

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा; राज्यातील सरकारी शिक्षकांच्या बदल्या बंद होणार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा; राज्यातील सरकारी शिक्षकांच्या बदल्या बंद होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION