मुंबई : दिवाळीपूर्वी एसटी प्रवाशांना महागाईचा फटका बसणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस या भाडेवाढीपासून वगळण्यात आल्या आहेत. मात्र, इतर सर्व प्रकारच्या बसेससाठी ही दरवाढ लागू असेल. भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असला तरी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक गाड्या सोडण्याची तयारी केली आहे.
भाडेवाढीनंतरचे तिकिट दर :
- मुंबई – मालवण ( शिवशाही )
सध्याचे दर १३०० रुपये / दिवाळीत १४०० रुपये
- मुंबई – जळगाव (स्लिपर)
सध्याचे दर ११०० रुपये / दिवाळीत १२५० रुपये
- मुंबई – लातूर ( साधी )
सध्याचे दर ९०० रुपये / दिवाळीत १००० रुपये
- मुंबई – संभाजीनगर ( साधी )
सध्याचे दर ८०० रुपये / दिवाळीत ९०० रुपये
- मुंबई – जालना ( साधी )
सध्याचे दर ८०० रुपये / दिवाळीत ९०० रुपये
- मुंबई – सोलापूर ( साधी )
सध्याचे दर ७५० रुपये / दिवाळीत ८५० रुपये
- मुंबई – सांगली ( साधी )
सध्याचे दर ७३० रुपये / दिवाळीत ८०० रुपये
- परळ – कोल्हापूर ( साधी )
सध्याचे दर ६४० रुपये / दिवाळीत ७०० रुपये
- मुंबई – रत्नागिरी ( साधी )
सध्याचे दर ६०० रुपये / दिवाळीत ७०० रुपये







