मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट सोल्यूशन्स लिमिटेड या फिनटेक कंपनीने बुधवारी १२ मुंबई मेट्रो वन स्थानकांवर आपली नावीन्यपूर्ण स्मार्ट लॉकर प्रणाली यशस्वीरीत्या सुरू केल्याचे जाहीर केले. हा पहिलाच उपक्रम असून मुंबई मेट्रो वनच्या सहयोगाने राबविल्या जात असलेल्या या उपक्रमात मुंबईतील वाहतूक नेटवर्कमध्ये अत्याधुनिक अशी ९९६ पेक्षा जास्त डिजिटल लॉकर्स दाखल करण्यात आली आहेत. व्यापक प्रमाणात बसवलेली ही स्मार्ट लॉकर्स म्हणजे सुमारे ५ लाख प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवासातील सुविधा, लास्ट-माईल लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स डिलिव्हरीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ही लॉकर्स केवळ सुरक्षित स्टोरेजची सुविधा देत नाहीत, तर शहरी गतिशीलतेच्या भविष्यातील एक महत्त्वपूर्ण दुवा ठरतात. ती कार्यक्षम ई-कॉमर्स डिलिव्हरी सक्षम बनवतात, लॉजिस्टिक्समधील फर्स्ट अँड लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी वाढवतात आणि आधुनिक शहरवासीयांसाठी डोअर-टू-डोअर लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि शाश्वत बनवतात. या सेवा आणखी वाढवण्यासाठी ऑटोपे सध्या भारतातील मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. मुंबईत केलेला हा विस्तार देशभरात स्मार्ट मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याच्या ऑटोपेच्या धोरणात्मक योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मुंबई मेट्रो वन सोबतच्या भागीदारीला पुढे नेले आहे. ऑटोपे पेमेंट टेक्नॉलॉजीसह वाहतूक संचालनाच्या एकीकरणाला प्रोत्साहन देण्यास आणि देशभरात सुधारित कार्यक्षमता आणि प्रवाशांच्या अनुभवासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा करून घेण्याबाबत वचनबद्ध आहे. ऑटोपे स्मार्ट लॉकर्स अशा प्रकारे डिझाईन करण्यात आली आहेत की, मेट्रोच्या गजबजलेल्या ईकोसिस्टममध्ये ती सहज समाविष्ट होऊ शकतील आणि प्रवासी व शहरी हितधारकांसाठी अनेक सुविधा आणि लाभ प्रदान करतील.
प्रवासी आणि शहरी ईकोसिस्टमसाठी फायदे :
- प्रवाशांची वाढीव सुविधा : मेट्रोच्या प्रवाशांना प्रवास करताना सहजपणे ऑनलाइन ऑर्डर घेणे किंवा आपल्या व्यक्तिगत गोष्टी सुरक्षित ठेवणे शक्य होते.
- शाश्वतता : मेट्रो स्थानकांवर डिलिव्हरीज एकत्र करून स्मार्ट लॉकर्स लास्ट-माईल उत्सर्जन कमी करण्यात, हरित शहरी लॉजिस्टिक्सला प्रोत्साहन देण्यात आणि शहरी वाहतूक कोंडी कमी करण्यात योगदान देतात.
- ब्रँड एंगेजमेंट : ही ईकोसिस्टम रिटेल आणि डिलिव्हरी पार्टनर्ससाठी एक दृश्यमान आणि उच्च-फुटफॉल असलेले टचपॉइंट उभे करते आणि मेट्रो ईकोसिस्टममध्ये नवीन व्यावसायिक संधी निर्माण करते.
- प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा : मेट्रोच्या सेवेच्या ईकोसिस्टममध्ये भर घालते आणि अशाप्रकारे, सार्वजनिक वाहतुकीस अधिक आकर्षक, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी एकीकृत पर्याय बनवते.







