मुंबई : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना सतत घडताना दिसत आहेत. बदलापूर, पुणे, जळगाव आणि चंद्रपूर राज्यातील असा कोणता जिल्हा नाही जिथे अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत झालेल्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यातलं अख्खं वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक केली आणि काही दिवसानंतर त्याचा कथित एन्काऊंटर केला. याचदरम्यान, मुंबई मधल्याच भाईंदरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना पोलिस भाईंदर-नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे.
भाईंदर-नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलेली आहे. आरोपी आणि पीडिता वेगवेगळ्या धर्माचे असल्याने भाईंदरमध्ये जोरदार राडा झाला आहे. गुन्ह्याच्या निषेधार्थ रात्री शेकडोंचा जमाव भाईंदरमध्ये जमा झाला होता. जमावाने आरोपीच्या दुकानाची तोडफोड करुन नराधमावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याव्यतिरिक्त काहीही माहिती अद्याप मिळालेली नाहीय तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.