मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीच्यआ प्रचार सभांच्या तोफा या १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी संपूष्ठात येणार आहेत.त्यामुळे १७ नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्ज केले होते.यामध्ये राज ठाकरेंनी प्रथम अर्ज केल्याने त्याना सभेची परवानगी मिळाली होती. मात्र आता राज ठाकरे यांनी आता १७ नोव्हेंबरला सभा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच राज ठाकरे यांनी सभा न घेण्यामागचं नेमकं कारणही सांगितले आहे. राज ठाकरे हे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा या १८ नोव्हेंबरच्या संध्याकाळी संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे १७ नोव्हेंबरला मुंबईत शेवटची सभा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सूरू केली होती. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळेच याच दिवशी सभा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्ज केला होता. यामध्ये राज ठाकरे यांनी पहिला अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना १७ नोव्हेंबरला सभा घेण्याची परवानगी त्यांना मिळाली होती. मात्र आता ही सभा अचानक रद्द करण्यात आली आहे.
१७ नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी राज ठाकरेंना परवानगी मिळाली होती. पण उशिरा परवानगी मिळाल्याने सभा न घेण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.त्यामुळे १७ नोव्हेंबरला आम्ही सभा घेणार नाही आहोत,असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच परवानगी न मिळण्यामागे काही राजकारण आहे की नाही हे मला माहित नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या अनेक सभा झाल्या आहेत, त्या सभांमध्ये जे सांगायचं ते सांगून झालंय. आता दीड दिवस उरलाय. त्याच्या तयारीला वेळ लागतो. उमेदवारांचही वेळ जातोय, त्यामुळे सभा रद्ग करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान जर राज ठाकरेंनी सभा घेण्यास नकार दिला आहे. तर आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपैकी एका शिवसेनेला सभेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता सभेची परवानगी कोणत्या पक्षाला मिळते,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.