मुंबई : सरकारने ओला, उबरच्या कंपन्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता या ॲपद्वारे चालणाऱ्या टॅक्सीचे रजिस्ट्रेशन फक्त ८ वर्षांपर्यंत चालणार आहे. यानंतर या टॅक्सी वापरता येणार नाही. त्यामुळे फक्त ८ वर्षांसाठी तुम्हाला ओला-उबरच्या टॅक्सी वापरता येणार आहे. ८ वर्षांच्या वापरानंतर जरी वाहन चांगल्या अवस्थेत असेल किंवा वाहन चालवता असेल तरीही या वाहनांना चालवण्याची परवानगी नसणार आहे.८ वर्षानंतर हे वाहन कमर्शियल उपयोगासाठी वापरले जाणार नाही. हे वाहन रिटायर्ड मानले जाणार आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू केला जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम हजारो वाहनचालकांवर होणार आहे. ज्या वाहनचालकांचा महिन्याचा खर्च हा ओला-उबर चालवून होतो त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. ओला(OLA) आणि उबरच्या (UBER) डेटानुसार, २० टक्के टॅक्सी या ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यामुळे यांना रिप्लेस करावे लागेल किंवा स्वतः च्या वापरासाठी ठेवाव्या लागतील. या वाहनांना तुम्ही विकूदेखील शकता. परंतु यामुळे वाहनचालकांच्या खिशाला फटका बसणार असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य लोकांना हे परवडण्याजोगे नाही आबे. ईएमआय संपत नाही तेच तुम्हाला वाहनदेखील वापरता येणार नाही, असं वाहनचालकांसोबत होईल.





