मुंबई : साकीनाका पोलिसांनी ड्रग्सचा फॅक्टरी उद्धवस्त केलीय. मुंबई पोलिसांनी कर्नाटक राज्यात जाऊन MD ड्रॅग बनवणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई केलीय.पोलिसांनी ४०० कोटींचा ड्रग्स जप्त केलाय. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी ४ आरोपींना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १८८ किलो MD ड्रग जप्त करण्यात आले आहे. कर्नाटकमधून हे सर्व आरोपी मुंबई शहरात MD ड्रग पुरवठा करत होते. आत्तापर्यंत एकूण ८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या ड्रग्सप्रकरणी साकीनाक पोलीस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासदरम्यान पोलिसांना म्हैसूरमधील ड्रग्स फॅक्टरीचा तपास लागला. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी कर्नाटक राज्यात धाड टाकली. या कारवाईत ३९० कोटीचे आमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. याप्रकरणी परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी कारवाईची माहिती दिली. एप्रिल महिन्याच्या शेवटी साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये ड्रग्स प्रकरणी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या आधारे तपास करत पहिल्या आरोपीकडून ५२ ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आलं होतं. याच प्रकरणात अजून तीन आरोपींना अटक करण्यात आली. सुरुवातीची दोन आरोपींकडून ४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आली. त्यानंतर पकडण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांना म्हैसूरच्या फॅक्टरीचा तपास लागला. या आरोपींकडे एमडी ड्रग्सचा पुरवठा हा म्हैसूरच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फॅक्टरीतून होत होता.







