कल्याण : कल्याण शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसीच्या शहर अभियंत्यांची भेट घेत जाब विचारला. तसेच अधिकाऱ्यांनी येत्या ४८ तासात जर रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांना त्याच खड्डयात बसवू, असा इशारा देखील मनसेने दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांचे अक्षरशः चाळण झाली आहे. पावलो पावली असलेल्या खड्यांमुळे नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र अद्यापही रस्त्यांवरील परिस्थिती जैसे थे आहे.
पावसाचे कारण महापालिकेचे खड्डे भरण्याचे काम हे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आता केला जातोय. या खड्डयांप्रश्श्री मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केडीएमसीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली. शहरातील खड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांवरील खड्यांबाबत त्यांना जाब विचारला. यावेळी मनसेने खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांना ४८ तासांची मुदत दिली असून, या वेळेत रस्त्यांवरील खड्डे बुजवले गेले नाहीत. तर अधिकाऱ्यांना त्या खड्यांमध्ये बसवण्याचा इशारा दिला आहे.