मुंबई : मराठी आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता मीरा रोड येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. परंतू त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबाबत अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
प्रिया मराठे हिने मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलेय. प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला होता. तिने २४ एप्रिल २०१२ रोजी शांभाजी दीदीचे नातू आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंचे मुलगा शंतनू मोघे यांच्याशी विवाह केला. कॅन्सरशी दोन वर्षांहून अधिक काळ अनिडग संघर्ष करूनही, प्रिया शेवटपर्यंत पडद्यावर परत येण्याचा आणि चाहत्यांच्या मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती. २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या हिंदी मालिका आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने ‘विघ्नहर्ता महागणपती’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ (२०१६) या मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत रागिणी अग्निहोत्री ही खलनायकी भूमिका साकारत होत्या.







