• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर सिंधुदुर्ग

आंबा-काजू शेतीला आता AI तंत्रज्ञानाची जोड; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘स्मार्ट शेती’चा शुभारंभ

admin by admin
October 5, 2026
in सिंधुदुर्ग
0
आंबा-काजू शेतीला आता AI तंत्रज्ञानाची जोड; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘स्मार्ट शेती’चा शुभारंभ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानाचा फटका गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करून शेतकऱ्यांना शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित शेतीकडे वळवण्यासाठी जिल्ह्यात AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या दोन वर्षांच्या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा त्यामध्ये समावेश असेल. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठे आणि शासन विविध शाश्वत उपाययोजना राबवत असून, AI च्या मदतीने शेती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जगातील अनेक देशांप्रमाणे सिंधुदुर्गातील शेतकरीही तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे राहू नयेत, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती अधिक फायदेशीर होण्याबरोबरच तरुण पिढीचा शेतीकडे ओढा वाढेल आणि जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या उद्दिष्टालाही चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पांतर्गत आंबा आणि काजू पिकांशी संबंधित माहिती AI प्रणालीद्वारे संकलित व विश्लेषित केली जाईल. त्याआधारे शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन, रोग नियंत्रण, हवामानाचा अंदाज आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन मोबाईलद्वारे मराठी भाषेत उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT तंत्रज्ञान, उपग्रह छायाचित्रे, AI आधारित पीक निरीक्षण आणि डिजिटल मॅपिंगचा वापर करून शेतीचे वैज्ञानिक व्यवस्थापन केले जाईल. तसेच प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे डिजिटल वॉर रूम उभारण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्ड उपलब्ध करून प्रकल्पावर सातत्याने देखरेख ठेवली जाईल. एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी सादरीकरणाद्वारे या तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करताना, AI मुळे उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि पीक व्यवस्थापन अधिक अचूक करणे शक्य होत असल्याचे सांगितले. ऊस पिकात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला असून त्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले, तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा उपक्रम जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी लाभदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, विविध अधिकारी, प्रगतिशील शेतकरी आणि मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

मराठी केवळ संवादाची भाषा नाही, डिजिटल युगात तिला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

मुंबईत रंगला राज-उद्धव ठाकरेंचा ‘गर्जना मोर्चा’; निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची हकालपट्टी आणि बॅलेट पेपरची केली मागणी

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,127)
  • मुंबई (3,542)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (555)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION