• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मराठी केवळ संवादाची भाषा नाही, डिजिटल युगात तिला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
October 5, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मराठी केवळ संवादाची भाषा नाही, डिजिटल युगात तिला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची, इतिहासाची आणि साहित्यपरंपरेची वाहक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीला २१व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये तिचा व्यापक वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले. चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला, हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला राष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाल्याचे नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासोबत स्वभाषेलाही महत्त्व देत राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविला, याची आठवण करून देत त्यांनी आधुनिक काळातही प्रशासन, शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित केली. जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगत त्यांनी मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख केला. मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचे सांगत राज्य शासनाच्या शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द असून, भविष्यात ही शब्दसंपदा १३ लाखांपर्यंत वाढविण्याचे काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठीला भविष्यातील ज्ञानभाषा बनविण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, संशोधन आणि शिक्षणाशी संबंधित संकल्पना मराठीत उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘मराठी AI’च्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढविणे, डिजिटल माध्यमांवर मराठीतील माहिती आणि ज्ञानसामग्री उपलब्ध करून देणे तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर दर्जेदार मराठी आशय निर्माण करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये मराठीतील अभ्याससामग्री उपलब्ध झाल्यास नव्या पिढीला मातृभाषेतून आधुनिक ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमाण मराठीसोबतच कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी-अहिराणी, मालवणी, डांगी आणि झाडीबोली यांसारख्या बोलीभाषा हा मराठीचा अमूल्य वारसा असल्याचे सांगत त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचाही उल्लेख करत अनेक पिढ्यांच्या कलावंतांनी अभिनय, लेखन आणि प्रयोगशीलतेच्या माध्यमातून मराठी नाट्यसंस्कृती समृद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले. मराठीचे जतन आणि संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक मराठी भाषिकाने घर, शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर करून त्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. परंपरेचा अभिमान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत मराठीला जागतिक स्तरावर सक्षम, समृद्ध आणि प्रभावी ज्ञानभाषा बनविणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.

Previous Post

इंधन दरवाढीला ब्रेक लावण्यासाठी G7 देशांचा एकत्र पुढाकार; १०० दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा करणार

Next Post

आंबा-काजू शेतीला आता AI तंत्रज्ञानाची जोड; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘स्मार्ट शेती’चा शुभारंभ

admin

admin

Next Post
आंबा-काजू शेतीला आता AI तंत्रज्ञानाची जोड; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘स्मार्ट शेती’चा शुभारंभ

आंबा-काजू शेतीला आता AI तंत्रज्ञानाची जोड; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते 'स्मार्ट शेती'चा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (63)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,139)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (496)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (115)
  • नाशिक (85)
  • पालघर (76)
  • पालघर (49)
  • पुणे (1,058)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,127)
  • मुंबई (3,542)
  • रत्नागिरी (60)
  • राजकीय (282)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (555)
  • वसई-विरार (67)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (209)

Follow Us

Recent News

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सामाजिक कार्य

December 26, 2025

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

खेळाडूंच्या शासकीय आरक्षणात पारदर्शकता; ५ टक्के कोट्यासाठी ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ बंधनकारक

October 5, 2026
राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

राज्यावर पाणीटंचाईचे संकट; १६ ऑक्टोबरपासून सर्व शहरांत १० टक्के पाणीकपात लागू!

October 5, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र आणि निवडणूक आयोगाला नोटीस

October 5, 2026
मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

मंदिरात न जाताच मिळणार साईबाबांचा प्रसाद; शिर्डी महामार्गावरील केंद्रातून भाविकांना लाडू वाटप सुरू

October 5, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION