मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात घडला आहे. मुंबई एअरपोर्टवर एका मालवाहू ट्रकनी विमानाला धडक दिली आहे. अकासा एअरलाईन्सच्या विमानाला एका मालवाहू ट्रकने धडक दिल्याची घटना घडली आहे. हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाणार होते. या अपघातामध्ये विमानाचे आणि ट्रकचे देखील नुकसान झाले आहे.
अकासा एअरलाईन्सचे एक विमान मुंबईवरून दिल्लीला उड्डाण करणार होते. मात्र कार्गो ट्रकने धडक दिल्याने या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले. विमान उड्डाण करण्याआधी हा अपघात घडला. या अपघातामध्ये मालवाहू ट्रकचे आणि विमानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई एअरपोर्टवर ही घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. हे विमान बंगळुरूवरून मुंबईला आले होते. तिथून ते दिल्लीला उड्डाण करणार होते. मुंबई लँड झाल्यावर या विमानातून माल उतरवला जात होता. दरम्यान माल असणाऱ्या एका ट्रकचा भाग विमानाच्या पंख्याला धडकला. त्यामुळे विमानाचे नुकसान झाले व उड्डाण रद्द करण्यात आले आहे.







