पुणे : शहरातील इमारतींच्या टेरेसवरील बेकायदेशीर अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि बेकायदेशीररित्या चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच नियमांचे उल्लंघन करुन पब, बार, रेस्टो बार, रूफ टॉप हॉटेल, क्लब चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय बिअर बार, परमिट रुम, रेस्टॉरंट यांच्यासाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, १४४ सीआरपीसी ची ऑर्डर काढण्यात येणार आहे. यामध्ये बार, परमिट रुम, रेस्टोरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंट यांना नोटीस दिली जाणार आहे. तसेच मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. तसेच रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.