वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात वर्ल्ड कप २०२३चा सामना झाला. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाची दाणादाण उडवली. टीम इंडियाने २४३ धावांनी हा सामना जिंकलाय. कोहलीच्या ‘विराट’ रुपानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला रविंद्र् जडेजाच्या वादळाचा तडाखा बसला. भारतीय संघाने दिलेल्या ३२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या दमछाक उडाली. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ८३ धावांवर ऑल आऊट झाला. भारताडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने ३३ धावा देत ५ विकेट घेतल्या. या वर्ल्ड कप २०२३ च्या पॉइंट टेबलमध्ये भारत अव्वलस्थानी आहे. या क्रिकेटच्या महासंग्रामात भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याचा अजून पराभव झाला नाहीये. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलं.